अस्थिबंधाना इजा बऱ्याच वेळेस एक्स-रे मध्ये फ्रँक्चर नाही,हे कळाल्यावर मन सुखावत.पण कधीकधी ते सुख क्षणभंगुर ठरत.वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार एकस-रे म्हणजे सावली.फक्त सावली पाहून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते.तसेच नुसते एकस-रे काढून निर्णय घेणेही चुकीचे असते.म्हणून डॉक्टर म्हणतात,प्रथम रुग्ण तपासतो,मग एकस –रे किंवा त्याचा रिपोर्ट दाखविण्याची घाई असते. रुग्णाची विचारपूस केल्यावर ज्याला आपण केस-हिस्ट्री म्हणतो.त्यात त्याला कुठे व कसल्या प्रकारचा मार लागला असेल,याचा अंदाज येतो,तसेच तपासल्यावर नेमका कोणत्या ठिकाणी मार लागला आहे, हे कळते.त्यानंतर एकस –रे चा बोध होतो. तो निश्चितच अधिक चांगला होतो.बारीक फ्रँक्चर असले तरी ते मग दिसून येते.तोच एकस –रे रुग्ण तपासण्याआधी पाहिला ,तर अगदी बारीक क्रँक- फ्रँक्चर नेमक्या ठिकाणी लक्ष केंद्रित न केल्यामुळे नजरेतून सुटते.तसेच काही अशा प्रकारचे मार असतात, कि ज्यामुळे फ्रँक्चरइतकेच अपंगत्व येते. हाडांच्या भोवती स्नायू ,शिरा असतात.त्या माराचा एकस-रे काढल्यास ‘नो- बोन एन्जुरी ’ असा रिपोर्ट क्ष-किरणतज्ञ देतात.पण तसेच ते म्हणतात kindly correlate clinically