Skip to main content

Posts

Showing posts with the label joint_replacement

की-होल सर्जरी – इंटरलॅाकिंग नेलिंग

की-होल सर्जरी – इंटरलॅाकिंग नेलिंग       एखाद्या अस्थिभंगावर उपचार करण्यासाठी अद्ययावत C-Arm Image Intensifier हे अत्यंत उपयुक्त असे यंत्र आहे. हे आपण मागील भागात पहिले.उ-अी च्या जोडीला एक उपयुक्त साधन म्हणजे अॅडव्हान्स ऑथ्रोपेडीक ऑप्रेशन टेबल.      शस्त्रक्रिया करताना मोडलेल्या हाडांवर ताण देऊन चांगल्या स्थितीत (अलाईनमेंट) मध्ये आणले जाते. फ्रॅक्चर झालेल्या हाडांना ताण देण्यास चांगला व सहनशील असिस्टंट असणे आवश्यक आहे.भूल दिल्यामुळे स्नायू ढिले (रिलॅक्स) झालेले असतात,पण कधी अस्थिभंग झाल्यावर व जास्त दिवस झाल्यामुळे आत ते स्नायू एकमेकांना फायब्रोसिसमुळे चिकटले असतात. ऑप्रेशनच्या वेळेस छेद घेऊन हे स्नायू मोकळे करावे लागतात फायब्रोसिसमुळे त्यांना बराच वेळा छेद घेऊनसूद्धा योग्य अलाईनमेंट आणणे मोठ्या कसबाचे कार्य असते.त्यात कधी खूप दमछाक होते. अशा परिस्थितीत जिथे ओपन करूनसुद्धा हाडांना अलाईनमेंट आणणे अवघड असेल तर फ्रॅक्चर ओपन न करता म्हणजे छेद न घेता अजूनच जिकीराचे व अवघड असते.ओपन न करता अस्थिभंगावर उपचाराला क्लोजड टेक्निक ऑफ फ्...

कृत्रिम सांधेरोपण

   सांध्याची झीज कारणे व उपाय            सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.     हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.      वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया. १.        a : काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते. २...