Skip to main content

अस्थिबंधाना इजा

 अस्थिबंधाना इजा


बऱ्याच वेळेस एक्स-रे मध्ये फ्रँक्चर नाही,हे कळाल्यावर मन सुखावत.पण कधीकधी ते सुख क्षणभंगुर ठरत.वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार एकस-रे म्हणजे सावली.फक्त सावली पाहून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते.तसेच नुसते एकस-रे काढून निर्णय घेणेही चुकीचे असते.म्हणून डॉक्टर म्हणतात,प्रथम रुग्ण तपासतो,मग एकस –रे किंवा त्याचा रिपोर्ट दाखविण्याची घाई असते.
     रुग्णाची विचारपूस केल्यावर ज्याला आपण केस-हिस्ट्री म्हणतो.त्यात त्याला कुठे व कसल्या प्रकारचा मार लागला असेल,याचा अंदाज येतो,तसेच तपासल्यावर नेमका कोणत्या ठिकाणी मार लागला आहे, हे कळते.त्यानंतर एकस –रे चा बोध होतो.
तो निश्चितच अधिक चांगला होतो.बारीक फ्रँक्चर असले तरी ते मग दिसून येते.तोच एकस –रे रुग्ण तपासण्याआधी पाहिला ,तर अगदी बारीक क्रँक- फ्रँक्चर नेमक्या ठिकाणी लक्ष केंद्रित न केल्यामुळे नजरेतून सुटते.तसेच काही अशा प्रकारचे मार असतात, कि ज्यामुळे फ्रँक्चरइतकेच अपंगत्व येते. हाडांच्या भोवती स्नायू ,शिरा असतात.त्या माराचा एकस-रे काढल्यास ‘नो- बोन एन्जुरी असा रिपोर्ट क्ष-किरणतज्ञ देतात.पण तसेच ते म्हणतात kindly correlate clinically  म्हणजे तपासणी करूनच निश्चित काय ते कळू शकेल.
v अस्थिबंधाचे मार
सांध्याच्या हालचाली विशीष्ट मर्यादीत कक्षांमध्ये होत असतात.गुडघ्याची हालचाल एका दिशेत होते.(युनी-अँक्शीयल) तर खांद्याची हालचाल वेगवेगळ्या दिशेत होते (मल्टी - अँक्शीयल),सांध्याच्या मुलभूत रचनेमुळे आणि अस्थिबंधामुळे प्रमाणापेक्षा जास्त हालचाल होत नाही. जर प्रमाणापेक्षा जास्त हालचाल झाली ,जर प्रमाणापेक्षा जास्त हालचालझाली.तर सांध्याचे आवरण फाटते व सांध्यांत रक्तस्त्राव होतो. त्याला Haemarthosis म्हणतात.तसेच सांध्याचे स्थिरता देणारे अस्थिबंध फाटू शकतात.असे जरझाले, तर सांधा अस्थिर होतो.गुडघ्याचे अस्थिबंध फाटले,तरचालताना पाय लपकतो तसेच घोट्याच्या अस्थिबंधला मार असेल तर तो वारंवार मुरगाळतो.हलका मार असेल म्हणजे अस्थिबंध नुसते ताणले गेले असतील,तर औषधाने सूज कमी होते व तो बरादेखील होतो.पण मार जास्त प्रमाणात असेल,तर त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असते.मर्यादेपेक्षा जास्त ताणले गेले,तर अस्थिबंध फाटतात.फाटण्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
v अर्धवट किंवा अपूर्ण व  पूर्ण.
ज्याप्रमाणात अस्थिबंध फाटतो, त्याप्रमाणात त्यापासून समस्या निर्माण होतात.सांधा अस्थिर होतो.त्यामुळे परत पडून अजून मार लागू शकतो किंवा खूप दिवस सारखे सारखे लपकल्यामुळे सांध्याची लवकर झीज होते व तो सांधा खराब होतो. म्हणून अशी जर अस्थीबंधाची इजा-मार असेल,तर योग्य उपचार होणे आवश्यक आहे.
   अपूर्ण अस्थिबंध फाटण्याचे प्रमाण जास्त रुग्णांमध्ये आढळतो. त्याचा उपचार सोपा असतो.कधी फक्त चिकटपट्टीने बांधले म्हणजे स्टॅपिंग केले,तरी बरा होतो किंवा कधी प्लास्टर करावे लागते.अशा प्रकारे काही आठवडे सांध्याला स्थिर ठेवण्यात येते.असे केले असता मार बसलेल्या सांध्यावर पुन्हा ताण पडत नाही व त्याला चागला आराम मिळतो.हालचाल न झाल्यामुळे त्याचे हिलिंग चांगले होते. हाताच्या सांध्यासाठी तीन आठवडे ,तर पायाच्या सांध्यासाठी चार – सहा आठवडे हालचाल बंद ठेवण्यासाठी बांधून ठेवावे लागतात.नुसता लेप लावून किंवा साधारण बांधून पुन्हा ताण पडतोच.त्यामुळे आत बऱ्या होणाऱ्या इजेतल्या पेशींवर इतर घटकांचा गुंता जास्त प्रमाणात वाढतो.याला फायबोसीस म्हणतात.असे झाल्यामुळे इजा बरी होण्यास जास्त दिवस वेळ लागतो व होणारे दुखणेही जास्त दिवस वेळ लागतो व होणारे दुखणेही जास्त कालावधीसाठी रेंगाळते.काही पूर्ण फाटलेल्या अस्थिबंधासाठी शस्त्रक्रिया पण कराव्या लागतात.कधी कधी मार लागल्यामुळे सांधे निखळतात.
v सांधे निखळण्याची कारणे
१.          प्रमाणापेक्षा जास्त-एकाच विशिष्ट दिशेने ताण पडल्यामुळे तिथले सांध्यांचे आवरण (कॅप्सूल) फाटून हाडांचा तो भाग सांध्याच्या बाहेरयेतो.त्याला अॅक्युट डीसलोकेशन म्हणतात.
२.             तसेच पूर्वीच्या मारामध्ये अस्थिबंधाचे हिलिंग जर व्यवस्थित झाले नसेल,तर त्याची लवचिकता कमी होते व त्यामुळे ते सांध्याला स्थिर ठेवू शकत नाहीत व त्या बाजूचे हाड संध्यातून सटकण्यास सुरुवात होते. अर्धवट सटकण्यास सबल्क्सेशन म्हणतात. पूर्ण सटकन्याला निखळणे किंवा डीसलोकेशन म्हणतात. कधी कधी काही कारणांमुळे हाडांची ठेवण. सांध्यांची ठेवण यात मूलतः दोष असतो. त्याची उंची-खोली योग्य नसल्यामुळे हलक्या हालचालीमुळे सांधा निखळतो त्याला रिकरंट डीसलोकेशन  म्हणतात.
सांध्यातील दोन्ही बाजूंची हाडे एकमेकांवर घासून त्यांची लवकर झीज झाली असती व लवकर खराब होऊन हलचालीवरही लवकर मर्यादा आल्या असत्या. तसे होऊ नये म्हणून निसर्गाने एकमेकांवर घासणारा भाग गुळगुळीत बनवला आहे. त्यावर आवारण दिलेले आहे. त्याला हायलाईन कार्टीलेज म्हणतात. तसेच सांध्यांच्या आवरणाला (कॅप्सूलला) चिटकून जे आवरण असते त्याला सायनोबियल मेम्ब्रेन म्हणतात. या सायनोबियल मेम्ब्रेनच्या पेशीपासून चिकट तेल वंगण तयार होते व सांध्यात सोडले जाते. त्यामुळे देवाने सांधे जास्त दिवस चांगले राहावेत, यासाठी अशी सोय केली आहे. जेव्हा सांधा निखळतो, तेव्हा हायलाईन कार्टीलेजच्या पेशींच्या पोषण क्रियेला(metabolism) बाधा येते. या कारणामुळे हाड परत सांध्यात ताबडतोब व योग्य असे बसवणे गरजेचे असते. काही दिवस सांधा बसवला न गेल्यास त्याला unreduced dislocation (अनरीड्यूस डीसलोकेशन) म्हणतात. जास्त दिवस सांध्यांच्या बाहेर हाड राहिल्यास हे आवरण सुकते व पूर्वीसारखे गुळगुळीत राहत नाही. त्यामुळे असे जास्त काळ निखळलेला सांधा पूर्ण बरा होत नाही व सारखा दुखत राहतो.
                पूर्वी योग्य ते उपचार न घेतल्यामुळे कुस्तीगीर, खेळाडू व इतर रुग्ण आता आपल्या वृद्धकाळापूर्वीच सांधेदुखी व झीज (ऑरट्रायटीस) या आजाराने बेजार आहेत.
                सांधा वारंवार निखळणे(रिकरंट डीसलोकेशन) या आजाराचे कारण वेळेच्या आधी बांधून ठेवलेला सांधा मोकळा करणे व त्यानंतर जरुरी असलेला व्यायाम न करणे हेच होय. ब-याच वेळेस रुग्णाचा उतावळेपणा नडतो. कधी कधी हाडे बसविना-यांकडे व सांधा बसवून घेणे मग तो निट बसला आहे किंवा नाही याची एक्स-रे तपासणी होत नाही. बसविणारे नुसते बसवितात नंतर काही आठवडे बांधून ठेवणे असे नसते तर नंतर व्यायाम करावे लागतात. असे मार्गदर्शन देखील नसते.
v निखळलेल्या सांध्याच्या समस्या :
सांध्याला मार लागल्यामुळे सांध्याच्या भोवतालच्या भागास सूज येते व नंतर तिथले द्रव सुकाल्यानंतर शिरा व अस्थीबंध आखडून जातात, त्यामुळे सांध्यांची लवचिकता कमी होते म्हणजेच सांध्यात ताठरपणा येतो (जॉईंट स्टीपनेस) किती प्रमाणात व किती काळ बांधावे याचे प्रमाण तज्ञांनी सांगून ठेवले आहे. जास्त प्रमाणात जर बांधले किंवा आवश्यक नाही असे जरी बांधले तरी सांध्यामध्ये ताठरपणा येतो. बसविना-यांकडून हे अयोग्य रीतीने बांधले गेले तरी ताठरपणा येतो.
                सांध्याला जर आराम नाही दिला व वारंवार चोळला गेला तर आत वाढलेल्या उष्णतेने जास्त प्रमाणात सूज वाढते. तसेच सांध्याच्या भोवती कॅल्शीयमचे कण सोडले जातात. त्याला (पोस्ट्रोमॅटिक कॅल्शीफिकेशन) म्हणतात. असे झाल्यास सांध्याला कायमस्वरूपी ताठरपणा येतो. याशिवाय सांध्याच्या भोवतालचे स्नायू कमकुवत होतात. तसेच कधी सांधा निखळताना नसेलाही मार लागू शकतो. अस्थीबंधांच्या इजेवरील समस्यांचा विचार करता सांधा निखळणे गंभीर समस्या आहे. त्यामुळे दुर्लक्ष न करता त्यावर योग्य व त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे.

डॉ.गिरीश औताडे.
(ओर्थोपेडीक & जॉइन रिप्लेसमेंट सर्जन)
फोन .(०२५३) २४७२५५२/५३ , ८८८८८ ७११५१

Comments

Popular posts from this blog

स्नायू- शिरांचे दुखणे

जिम मध्ये होणारे दुखणे /खेळांडूना होणारी दुखापत. कधी एखादे दुखणे असे जडते , की ते नेमके कशामुळे सुरु झाले हेच निष्पन्न होत नाही.सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात असलेले दुखणे क्षुल्लक कारणामुळे उदभवले असेल असे आपण समजतो.ताण पडल्यामुळे ,मुरगळल्या मुळे हे दुखणे सुरु झाले असावे ,ते आपोआप बंद होईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.असे काही दिवस जातात.एक-दोन आठवडे उलटल्यावर आपले दुखणे थांबलेले नसते.बऱ्याच वेळेस या दुखण्याकडे आपला दुर्लक्ष करण्याकडे जास्त कल असतो,पण नंतर हे त्रासदायक होत जाते.हलक्याफुलक्या दुखण्याला ( Dull ache ) ( डल एक ) म्हणतात, तर त्रासदायक झाल्यास त्याला बोरिंग पेन म्हणतात.सहसा अशा दुखण्यात स्नायू शिरांवर. सूज आल्यामुळे हे दुखणे सुरु झालेले असते.याचे कारण त्या शिरेवर अचानक ताण पडल्यामुळे तिथे दुखापत किंवा इजा झालेली असते किंवा कधी थोड्याप्रमाणात पुन्हा पुन्हा ताण पडल्यामुळे असे दुखणे जडते. अशा प्रकारचे दुखणे विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर जास्त आढळते.जसे ड्रीलिंगचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मनगटाचे किंवा कोपराच्या शिरामधले दुखणे असते.लोहारी कामामध्ये वारंवार

“अस्थिभंग व प्लास्टर ”

               प्ला स्टर हे P.O.P. प्लास्टर ऑफ पॅरीसचे बनविले जाते.प्रथम फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे जास्त प्रमाणात केमिकल बांधकाम व वैदिक व्यवसायात उपयोग झाला .त्या मुळे हे नाव वापरण्यात आले.याची सुरवात १८५२ मध्ये ए. मॅथिसन या आर्मीतल्या चिकित्साने याचा वापर स्प्लिंट   तयार करण्यासाठी केला.जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरीस तयार होते.जिप्सम हे हायडेटेड कॅल्शियम सल्फेट व त्यात इतर काही घटक असतात ते इतर घटक काढून स्वच्छ केल्यानंतर   अनहायड्रस कॅल्शियम सल्फेट तयार करतात.तेच हे P.O.P. पाण्यात टाकल्यानंतर एक्झोधर्मिक रिअॅक्शन होते.त्यामुळे प्लास्टर केल्यानंतर थोडावेळ गरम वाटते .             एकविसावे शतक आले तरी प्लास्टरपासून अजून काही सुटका मिळालेली नाही,असे चित्र सध्यातरी आहे.दिवस, महीने हा कालावधी कमी झाला पण प्लास्टर रहित अस्थिरोग उपचार असे परदेशातून सुद्धा ऐकावयास मिळालेले नाही.             प्लास्टर ची रुग्णांना अलर्जी,भीती असते मात्र नाईलाजाने ते प्लास्टर करण्यास तयार होतात ,मला चालता येणार नाही ,माझे फिरणे बंद होईल माझ्या दररोजच्या हालचालींवर मर्यादा येतील अशा प्रकारच्या क

सांध्याची झीज कारणे व उपाय

    सांध्याची झीज कारणे व उपाय             सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.     हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.      वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया. १.        a : काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते. २.        स्थूलपणा : वजन जास्त असणे म्हणजे सांध्यावर भार जास्त प्रमाणात येणार त्यामुळे झीजही लवकरच होणार.गुडघे