Skip to main content

की-होल सर्जरी – इंटरलॅाकिंग नेलिंग




की-होल सर्जरी – इंटरलॅाकिंग नेलिंग
      एखाद्या अस्थिभंगावर उपचार करण्यासाठी अद्ययावत C-Arm Image Intensifier हे अत्यंत उपयुक्त असे यंत्र आहे. हे आपण मागील भागात पहिले.उ-अी च्या जोडीला एक उपयुक्त साधन म्हणजे अॅडव्हान्स ऑथ्रोपेडीक ऑप्रेशन टेबल.
     शस्त्रक्रिया करताना मोडलेल्या हाडांवर ताण देऊन चांगल्या स्थितीत (अलाईनमेंट) मध्ये आणले जाते. फ्रॅक्चर झालेल्या हाडांना ताण देण्यास चांगला व सहनशील असिस्टंट असणे आवश्यक आहे.भूल दिल्यामुळे स्नायू ढिले (रिलॅक्स) झालेले असतात,पण कधी अस्थिभंग झाल्यावर व जास्त दिवस झाल्यामुळे आत ते स्नायू एकमेकांना फायब्रोसिसमुळे चिकटले असतात. ऑप्रेशनच्या वेळेस छेद घेऊन हे स्नायू मोकळे करावे लागतात फायब्रोसिसमुळे त्यांना बराच वेळा छेद घेऊनसूद्धा योग्य अलाईनमेंट आणणे मोठ्या कसबाचे कार्य असते.त्यात कधी खूप दमछाक होते.
अशा परिस्थितीत जिथे ओपन करूनसुद्धा हाडांना अलाईनमेंट आणणे अवघड असेल तर फ्रॅक्चर ओपन न करता म्हणजे छेद न घेता अजूनच जिकीराचे व अवघड असते.ओपन न करता अस्थिभंगावर उपचाराला क्लोजड टेक्निक ऑफ फ्रॅक्चर फिक्सेशन म्हणतात,जर शस्त्रक्रियेच्या दरम्यान ओढाताण करून चांगल्या स्थितीत आणले तरीसुद्धा ते त्या स्थितीत टिकून ठेवणे आवश्यक असते.पण असे ओढून किंवा ताण देऊन एखादे रॉड किंवा प्लेट स्क्रूने पक्के केले जात नाही तोपर्यत ठेवायचे ? कधी पाच मिनिटे लागतात किंवाअर्धातासही लागतो.
    असिस्टंट हा सुद्धा माणूसच आहे,त्याच्याही सहनशीलतेला मर्यादा असतात.ताण सुटला,की बऱ्याच वेळा पुन्हा सुरुवातीपासून सगळी प्रक्रिया करावी लागते.त्यामुळे बऱ्याच अस्थिभंग शस्त्रक्रियांना जास्त कालावधी लागतो. अशा वेळेस जर फ्रॅक्चर चांगले  अलाईनमेंटमध्ये धरून ठेवणारे उपकरण असेल तर मानवी चूक किंवा भैातिक मर्यादा अशा त्रुटीवर मतकरता येते.हेच करण्याकरिता आपल्याला मदतहोते अॅडव्हांस ऑपरेशन टेबलची.मांडीच्या हाडाच्या अस्थिभंग शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला बांधायची स्थिती एक प्रकारे असते तर खुब्यासाठी दुसरी,नळीच्या अस्थिभंगासाठी निराळी,हातांच्या शस्त्रक्रियेसाठी आणखी वेगळी ,पण अशा सगळ्या निरनिराळ्या स्थितीत पेशंटला पोजिशन देऊन, अस्थिभंग असणाऱ्यांसाठी  ट्रेक्शन देऊन  अलाईनमेंट साधणे हे सरावाने अॅडव्हांस ऑथ्रोपेडीक टेबलच्या सहाय्याने शक्य झालेआहे.अवघड व गुतागुंतीच्या अस्थिभंगाच्या उपचारासाठी एक नवीन तंत्र शोधले आहे, ते म्हणजे इंटरलॅाकिंग नेलिंग.


इंटरलॅाकिंग नेलिंग – 
हाडांचा आकार हा एखाद्या ट्यूबसारखा (Uniform) नसतो.प्रत्येक ठिकाणी व्यास निरनिराळा असतो.एकाच मापाचा असणारा रॉड हा हाडांना एका रेषेत ठेवू शकतो, पण त्या अस्थिभंग झालेल्या जागी हाडांची हालचाल होत राहते.कारण सगळीकडे रॉड टाइट फिटिंग नसतो. हाड जुळण्याच्या प्रक्रियेला ही हालचाल हानिकारक असते.त्यामुळे अशी हालचाल बंद करण्यासाठी रॉड आणि हाडांच्या मधून आडवे स्क्रू टाकले जातात,यांना इंटरलॅाकिंग स्र्कू म्हणतात.नेल व स्क्रू यांनी केलेल्या फ्रॅक्चरच्या या शस्त्रक्रियेला इंटरलॅाकिंग नेलिंग असे म्हणतात. इंटरलॅाकिंग नेलिंग दोन प्रकारे करता येते, एक म्हणजे पूर्ण छेद घेऊन स्नायू,शिरा बाजूला करून हाडांची तुटलेली टोके उचलून रॉड टाकून ते जोडतात व लॉक करतात. याला ओपन इंटरलॅाकिंग नेलिंग म्हणतात.
   हाड जिथे मोडले आहे तिथे छेद न घेता अंदाज व अनुभव याचा योग्य वापर करून अस्थिभंग झालेली हाडे रॉडने जोडली व लॉक केली तर शस्त्रक्रियेस कलोजड इंटरलॅाकिंग नेलिंग म्हणतात.



क्लोज्ड नेलिंगाचे फायदे :
   कमी रक्तस्त्राव अस्थिभंग होतो तेव्हा तिथे आत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. एक दोन लिटर रक्त मांडीच्या हाडांच्या फ्रॅक्चरमध्ये जमा होते. हे शस्त्रक्रियेच्या वेळेस सगळे बाहेर काढले जाते.त्याशिवाय नवीन रक्तस्त्राव होऊन शरीरातले रक्ताचे प्रमाण घटते.

जंतू संसर्गाची शक्यता कमी- या शस्त्रक्रियेत  जंतूचे फ्रॅक्चर झालेल्या भागावर संसर्ग होण्याची संभावना कमी असते. फ्रॅक्चरच्या ठिकाणी छेद (इंसिजन) नसतो.म्हणजे जखम पिकणे,सेप्टिक होणे,ड्रेसिंग करावे लागते या समस्या अशा शस्त्रक्रियेनंतर खूपच कमी होतात.जखमा कमी असल्यामुळे हालचाली लवकर सुरु होतात वे त्यामुळे सांधे आखडण्याचे प्रमाण कमी असते.

लवकर हालचाली सुरु : इंटरलॅाकिंग नेलिंग जोडलेल्या हाडांना आधार भक्कम असल्यामुळे रुग्णांना जास्त वेळ बिछान्यावर पडून राहावे लागत नाही.तो लवकर आधाराने चालायला लागतो.

सांधे जुळण्यास लवकर सुरुवात : अस्थिभंग झालेल्या ठिकाणी जमा झालेले,साकळलेले रक्त (ब्लड क्वॅाट) हे हाडे जुळण्याच्या प्रक्रियेत एक पोषक घटक आहे. ओपन सर्जरीमध्ये मात्र ब्लड व क्लॉट वाहूनजातो.कारणछेद घेतल्यावर हाडे जोडताना तो काढावा लागतो.पण जेव्हा क्लोज्ड नेलिंग होते त्यावेळी हा ब्लड क्लॉट तिथेच राहतो व पोषक घटक (बोन हिलिंग फॅक्तर्र्स) हाडे जुळण्याच्या प्रक्रियेत वापरले जातात,त्यामुळे हाडे जुळण्याचे कार्य लवकर होते.

एक मोठी शस्त्रक्रिया टाळता येतो: कंपाउंड फ्रॅक्चर म्हणजे अस्थिभंग,फ्रॅक्चर व जखम असे असताना एक्सर्तनल फिक्सेटरची शस्त्रक्रिया आधी करून नंतर एक-दोन महिन्यांनी प्लेटिंग अशा दोन शस्त्रक्रिया  पूर्वी केल्या जात होत्या.आता कंपाउंड फ्रॅक्चरसाठीसुद्धा हि शस्त्रक्रिया (इंटरलॉकिंग नेलिंग ) केल्यावर मोठी शस्त्रक्रिया टाळता येते.

Comments

Popular posts from this blog

स्नायू- शिरांचे दुखणे

जिम मध्ये होणारे दुखणे /खेळांडूना होणारी दुखापत. कधी एखादे दुखणे असे जडते , की ते नेमके कशामुळे सुरु झाले हेच निष्पन्न होत नाही.सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात असलेले दुखणे क्षुल्लक कारणामुळे उदभवले असेल असे आपण समजतो.ताण पडल्यामुळे ,मुरगळल्या मुळे हे दुखणे सुरु झाले असावे ,ते आपोआप बंद होईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.असे काही दिवस जातात.एक-दोन आठवडे उलटल्यावर आपले दुखणे थांबलेले नसते.बऱ्याच वेळेस या दुखण्याकडे आपला दुर्लक्ष करण्याकडे जास्त कल असतो,पण नंतर हे त्रासदायक होत जाते.हलक्याफुलक्या दुखण्याला ( Dull ache ) ( डल एक ) म्हणतात, तर त्रासदायक झाल्यास त्याला बोरिंग पेन म्हणतात.सहसा अशा दुखण्यात स्नायू शिरांवर. सूज आल्यामुळे हे दुखणे सुरु झालेले असते.याचे कारण त्या शिरेवर अचानक ताण पडल्यामुळे तिथे दुखापत किंवा इजा झालेली असते किंवा कधी थोड्याप्रमाणात पुन्हा पुन्हा ताण पडल्यामुळे असे दुखणे जडते. अशा प्रकारचे दुखणे विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर जास्त आढळते.जसे ड्रीलिंगचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मनगटाचे किंवा कोपराच्या शिरामधले दुखणे असते.लोहारी कामामध्ये वारंवार

“अस्थिभंग व प्लास्टर ”

               प्ला स्टर हे P.O.P. प्लास्टर ऑफ पॅरीसचे बनविले जाते.प्रथम फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे जास्त प्रमाणात केमिकल बांधकाम व वैदिक व्यवसायात उपयोग झाला .त्या मुळे हे नाव वापरण्यात आले.याची सुरवात १८५२ मध्ये ए. मॅथिसन या आर्मीतल्या चिकित्साने याचा वापर स्प्लिंट   तयार करण्यासाठी केला.जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरीस तयार होते.जिप्सम हे हायडेटेड कॅल्शियम सल्फेट व त्यात इतर काही घटक असतात ते इतर घटक काढून स्वच्छ केल्यानंतर   अनहायड्रस कॅल्शियम सल्फेट तयार करतात.तेच हे P.O.P. पाण्यात टाकल्यानंतर एक्झोधर्मिक रिअॅक्शन होते.त्यामुळे प्लास्टर केल्यानंतर थोडावेळ गरम वाटते .             एकविसावे शतक आले तरी प्लास्टरपासून अजून काही सुटका मिळालेली नाही,असे चित्र सध्यातरी आहे.दिवस, महीने हा कालावधी कमी झाला पण प्लास्टर रहित अस्थिरोग उपचार असे परदेशातून सुद्धा ऐकावयास मिळालेले नाही.             प्लास्टर ची रुग्णांना अलर्जी,भीती असते मात्र नाईलाजाने ते प्लास्टर करण्यास तयार होतात ,मला चालता येणार नाही ,माझे फिरणे बंद होईल माझ्या दररोजच्या हालचालींवर मर्यादा येतील अशा प्रकारच्या क

सांध्याची झीज कारणे व उपाय

    सांध्याची झीज कारणे व उपाय             सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.     हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.      वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया. १.        a : काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते. २.        स्थूलपणा : वजन जास्त असणे म्हणजे सांध्यावर भार जास्त प्रमाणात येणार त्यामुळे झीजही लवकरच होणार.गुडघे