Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

की-होल सर्जरी – इंटरलॅाकिंग नेलिंग

की-होल सर्जरी – इंटरलॅाकिंग नेलिंग       एखाद्या अस्थिभंगावर उपचार करण्यासाठी अद्ययावत C-Arm Image Intensifier हे अत्यंत उपयुक्त असे यंत्र आहे. हे आपण मागील भागात पहिले.उ-अी च्या जोडीला एक उपयुक्त साधन म्हणजे अॅडव्हान्स ऑथ्रोपेडीक ऑप्रेशन टेबल.      शस्त्रक्रिया करताना मोडलेल्या हाडांवर ताण देऊन चांगल्या स्थितीत (अलाईनमेंट) मध्ये आणले जाते. फ्रॅक्चर झालेल्या हाडांना ताण देण्यास चांगला व सहनशील असिस्टंट असणे आवश्यक आहे.भूल दिल्यामुळे स्नायू ढिले (रिलॅक्स) झालेले असतात,पण कधी अस्थिभंग झाल्यावर व जास्त दिवस झाल्यामुळे आत ते स्नायू एकमेकांना फायब्रोसिसमुळे चिकटले असतात. ऑप्रेशनच्या वेळेस छेद घेऊन हे स्नायू मोकळे करावे लागतात फायब्रोसिसमुळे त्यांना बराच वेळा छेद घेऊनसूद्धा योग्य अलाईनमेंट आणणे मोठ्या कसबाचे कार्य असते.त्यात कधी खूप दमछाक होते. अशा परिस्थितीत जिथे ओपन करूनसुद्धा हाडांना अलाईनमेंट आणणे अवघड असेल तर फ्रॅक्चर ओपन न करता म्हणजे छेद न घेता अजूनच जिकीराचे व अवघड असते.ओपन न करता अस्थिभंगावर उपचाराला क्लोजड टेक्निक ऑफ फ्रॅक्चर फिक्सेशन म्हणतात,जर शस्त्रक्रियेच्या

कृत्रिम सांधेरोपण

   सांध्याची झीज कारणे व उपाय            सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.     हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.      वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया. १.        a : काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते. २.        स्थूलपणा : वजन जास्त असणे म्हणजे सांध्यावर भार जास्त प्रमाणात येणार त्यामुळे झीजही लवकरच होणार.गुडघे,खुबा,घोट

स्नायू- शिरांचे दुखणे

जिम मध्ये होणारे दुखणे /खेळांडूना होणारी दुखापत. कधी एखादे दुखणे असे जडते , की ते नेमके कशामुळे सुरु झाले हेच निष्पन्न होत नाही.सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात असलेले दुखणे क्षुल्लक कारणामुळे उदभवले असेल असे आपण समजतो.ताण पडल्यामुळे ,मुरगळल्या मुळे हे दुखणे सुरु झाले असावे ,ते आपोआप बंद होईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.असे काही दिवस जातात.एक-दोन आठवडे उलटल्यावर आपले दुखणे थांबलेले नसते.बऱ्याच वेळेस या दुखण्याकडे आपला दुर्लक्ष करण्याकडे जास्त कल असतो,पण नंतर हे त्रासदायक होत जाते.हलक्याफुलक्या दुखण्याला ( Dull ache ) ( डल एक ) म्हणतात, तर त्रासदायक झाल्यास त्याला बोरिंग पेन म्हणतात.सहसा अशा दुखण्यात स्नायू शिरांवर. सूज आल्यामुळे हे दुखणे सुरु झालेले असते.याचे कारण त्या शिरेवर अचानक ताण पडल्यामुळे तिथे दुखापत किंवा इजा झालेली असते किंवा कधी थोड्याप्रमाणात पुन्हा पुन्हा ताण पडल्यामुळे असे दुखणे जडते. अशा प्रकारचे दुखणे विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर जास्त आढळते.जसे ड्रीलिंगचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मनगटाचे किंवा कोपराच्या शिरामधले दुखणे असते.लोहारी कामामध्ये वारंवार

सांध्याची झीज कारणे व उपाय

    सांध्याची झीज कारणे व उपाय             सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.     हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.      वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया. १.        a : काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते. २.        स्थूलपणा : वजन जास्त असणे म्हणजे सांध्यावर भार जास्त प्रमाणात येणार त्यामुळे झीजही लवकरच होणार.गुडघे