जिम मध्ये होणारे दुखणे /खेळांडूना होणारी
दुखापत.
कधी एखादे दुखणे असे जडते , की ते नेमके कशामुळे सुरु झाले
हेच निष्पन्न होत नाही.सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात असलेले दुखणे क्षुल्लक
कारणामुळे उदभवले असेल असे आपण समजतो.ताण पडल्यामुळे ,मुरगळल्या मुळे हे दुखणे
सुरु झाले असावे ,ते आपोआप बंद होईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.असे काही दिवस
जातात.एक-दोन आठवडे उलटल्यावर आपले दुखणे थांबलेले नसते.बऱ्याच वेळेस या
दुखण्याकडे आपला दुर्लक्ष करण्याकडे जास्त कल असतो,पण नंतर हे त्रासदायक होत
जाते.हलक्याफुलक्या दुखण्याला (Dull
ache) (डल एक) म्हणतात,
तर त्रासदायक झाल्यास त्याला बोरिंग पेन म्हणतात.सहसा अशा दुखण्यात स्नायू
शिरांवर. सूज आल्यामुळे हे दुखणे सुरु झालेले असते.याचे कारण त्या शिरेवर अचानक
ताण पडल्यामुळे तिथे दुखापत किंवा इजा झालेली असते किंवा कधी थोड्याप्रमाणात
पुन्हा पुन्हा ताण पडल्यामुळे असे दुखणे जडते.
अशा प्रकारचे दुखणे विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर जास्त
आढळते.जसे ड्रीलिंगचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मनगटाचे किंवा कोपराच्या शिरामधले
दुखणे असते.लोहारी कामामध्ये वारंवार हातोडा मारल्यामुळे खांद्याचे दुखणे,टेनिस
खेळणाऱ्या खेळांडूमध्ये टेनिस एल्बो झालेला आढळतो.फँक्टरीमध्ये ओझे उचलण्याचे काम
करणाऱ्यांमध्ये होणारे पाठीच्या स्नायूंचे दुखणे,स्क्रू ड्रायव्हर,पान्ह्याच्या
सहाय्याने सारखे कामकरावे लागल्याने होणारे शिरांचे दुखणे,महिलांमध्ये खूप धुणे
पीळल्यामुळे किंवा खूप पापड लाटण्यामुळे असे हातांच्या शिरांचे दुखणे सुरु होते.
शरीराच्या वेगवेगळ्या भागात हात-पायांच्या शिरात किंवा
पाठीच्या स्नायूत असे दुखणे होते (त्याप्रमाणेच ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते)शिरांवर
(टेन्डंस)वर सूज आली कि त्याला
टेन्डीनायटीस म्हणतात.स्नायूंवर (मसल्स) सूज आल्यास मायोफेशीयटीस म्हणतात.कधी
एखाद्या स्नायूंवर किंवा वारंवार घर्षण होणाऱ्या भागात त्वचेच्या खाली जास्त
प्रमाणात सूज येते. कारण तेथे द्रव जमा झालेला असतो.त्या द्रवाभोवती एक आवरणही
तयार होते. या द्रवाने भरलेल्या पिशवीला बरसा म्हणतात व सूज आलेल्या स्थितीला
बरसायटीस म्हणतात. बरसायटीस स्नायुंपासून
शिरा तयार होतात.आणि स्नायूंचाच ते एक भाग असतात. या शिरांचा वेगवेगळ्या
कामात सहभाग असतानाही त्याचे घर्षण होऊन तुटत नाही कारण देवाने असे प्रयोजनच
केलेले आहे .ज्या ठिकाणी घर्षण व्हायची शक्यता असते,अशा भागात एक विशिष्ट आवरण
त्या शिरांभोवती असते. ज्याला सायनोवील मेमब्रेन म्हणतात आणि या आवरणातून एक चिकट
तेलकट द्रव (वंगण) या शिरेभोवती सोडला जातो.त्याला सायनोवील फ्लुइड म्हणतात आणि
आवरण असल्यामुळे घर्षणाचा परिणाम शिरेवर होत नाही.परंतु जास्त ताण पडल्यावर व
प्रमानापेक्षा जास्त द्रव तयार होतो व शिरेच्यात्या भागात सूज येते.शिरेच्याया
आवरणाच्या सूज आलेल्या भागाला टेनोसायनोव्हायटीस म्हणतात.
शरीरातील बरसायटीसची संभाव्य ठिकाणे : कोपरा (ओलेक्रेनॉन
बरसायटीस ) ,फरशी पुसताना गुडघ्यावर बसून पुसल्यावर इन्फ्रा. पटेलर बरसायटीस
वाटीच्या खालच्या. भागात होतो
शिरांवरील
सूज
: घोट्याजवळ पायमुरगळल्यामुळे पेरोनीयल टेनोसायनोबायटीस होतो.तसेच अंगठ्याजवळील
बोटांवर सूज आली तर त्याला डी करवेन्स टेनोसायनोवायटीस म्हणतात.माने जवळील पाठीच्या
स्नायूवर सूज आल्यास त्याला ट्रँपेझीअस मायोफेशीयटीस म्हणतात.त्याच्या थोडे खाली
म्हणजे छातीच्या मागच्या भागात रॉमबाईड बरसायटीस म्हणतात.Bench
press जास्त वजन
घेतल्यामुळे अथवा ताण पडल्यामुळे होतो.त्याच्या खाली किडनी या मागच्या बाजूच्या
स्नायूच्या दुखण्यास Latisinus Bursitis होते,जास्त पूल अपस काढल्यामुळे
शिरेवर ताण पडल्यामुळे असा त्रास होवू शकतो.
शिरांची
दुखण्याची लक्षणे : एखाद्या विशिष्ट कारणामुळे दुखणे सुरु होणे व वाढत जाणे.शिरा
असणाऱ्या भागात सूज येणे व दुखणे.शीर ताणल्यानंतर दुखण्याचे प्रमाण वाढणे किंवा
त्या भागाची हालचाल झाल्यानतर त्रास वाढणे.
१.)
स्नायू,शिरांच्या दुखण्यावरील उपचार: दुखऱ्या भागाला आराम देणे हा स्नायू
शिरांवरील उपचाराचा महत्त्वाचा घटक आहे.आराम म्हणजे पूर्णपणे झोपून राहणे असे
नाही.कारण काम करणाऱ्या व्यक्तीला काम थांबविणे परवडत नाही.म्हणजे काम करण्याच्या
स्वरुपातबदल केला तरीही त्या भागाला आराम मिळू शकतो.जर डाव्या हाताच्या मनगटावर
सूज असेल ,तरत्या हाताने जड वस्तूच कायपण हलकी बादली ,पिशविसुद्धा उचलणे टाळावे व
त्यासाठी उजव्या हाताचाच वापर करणे.तसेच दुचाकी वाहन चालविणे टाळावे,पण मागे
बसायला काही हरकत नाही
२.)
स्प्लिंटस किंवा सपोर्ट : शिरांवरील भार कमी करण्यासाठी
वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्लिंटस /सपोर्ट उपलब्ध आहेत.मनगटासाठी व्रीस्ट बँड,
घोट्यासाठी अँक्लेट,गुडघ्यासाठी नि कॅप यांच्या सहाय्याने किंवा क्रेप बँडेज
बांधून त्या त्या भागातील शिरांवरील भार कमी करता येतो.कोपऱ्याच्या बाहेरच्या
बाजूस Tennis elbow किंवा Golfer
elbow कोपऱ्याच्या आतल्या बाजूच्या
शिरेवर सूज आल्यामुळे होतो.त्यासाठी चांगले elbow सपोर्टस
उपलब्ध आहेत.
३.)
औषधे : वेदनाशामक या नावाने ओळखली जाणारी बरीच औषधे असतात.NSARDS या प्रकारच्या औषधाद्वारे दुखणे,त्याभागावरील आलेली
सूज कमी होते.परिणामता दुखणे कमी होते.म्हणजे दुखण्याचे जे कारण आहे,त्याच्यावर
उपचार होतो.केवळ वेदनांचेच शमन होत नाही. औषधे घेणे टाळणाऱ्यांमध्ये काही जण वेदना
सहन करू ,या विचाराच्या असतात.त्यांनी तसे करू नये.दिलेली औषधे घेतल्याशिवाय सूज
लवकर कमी होणार नाही म्हणून औषधे सांगितलेल्या कालवधीपर्यत घेतली पाहिजेत.काहींना
औषधामुळे पित्त किंवा अँसिडीटीचा त्रास नको.
अँसिडीटीची लक्षणे : पोटात दुखणे,चक्कर येणे,मळमळने,डोके
दुखणे ही सर्व अँसिडीटीची लक्षणे आहेत.ज्यांना असा त्रास आहे,त्यांनी डॉक्टरांना
त्याबद्द्ल आधीच सूचना केली तर त्यांना त्या अनुषंगाने औषधे दिली जातात.नवीन
प्रकारची काही औषधे अशी उपलब्ध आहेत , की त्यांची कार्यप्रणालीची वेगळी आहे व
त्यामुळे पित्त वाढत नाही . औषधे घेतल्यानंतर जर पित्ताचा त्रास झाला तर
डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट घ्यावी .अशा वेळेस गोळ्या बदलून
किंवा पित्तशामक गोळ्या देऊन पुढील उपचारचालू ठेवतायेतो.ज्या रुग्णांना औषधे सहन
होत नाही ,त्यांना तसेच औषधे घेऊनही त्रास कमीहोत नाहीअशा रुग्णाचा उपचार
उपकरणांच्या सहाय्याने होऊ शकतो.अशी उपकरणे अस्थिरोग तज्ञांकडे किंवा फ़िजिओथेरपि
सेंटरमध्ये असतात.
उपकरणाद्वारे
चिकित्सा
: वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांच्या सहाय्याने सूज कमी करणे, तसेच दुखणे कमी करणे
या प्रक्रियेला थेरपी म्हणतात.
अल्ट्रासाँनिक
थेरपी
: यात १ ते ३ MH२ या फ्रीक्वेन्सीच्या ध्वनीलहरी सूज असणाऱ्या ठिकाणी सोडल्या
जातात.त्यामुळे तिथे उष्णता निर्माण होते.
तिथली सूज
कमी होते.
तसेच
एकमेकांना चिकटलेल्या शिराही मोकळ्या होतात.
आय .एफ.टी.-
या उपकरणाव्दारे दोन वेगवेगळे हलके करंट त्या भागातून
सोडले जातात.त्यामुळे तिथल्या स्नायूचे आकुंचन व प्रसरण होते.त्या करण्यानेतेथील
रक्तप्रवाह वाढतो व तेथील सूज कमी होते.तसेच त्या भागाला मसाज केल्याप्रमाणे
आल्हाददायक वाटते.तसेच त्या भागाला मसाज केल्याप्रमाणे आल्हाददायक वाटते. तसेच
आकुंचन पावलेल्या स्थितीत असणाऱ्या शिरा प्रसरण पावल्यामुळे आराम मिळतो
.अँक्यूपंक्चरपेक्षा बरीच सुधारित आकृती असलेले हे उपकरण आहे.
इंजेक्शन थेरपी: काहींना औषधांचा त्रास होतो. औषधे
घेतल्यानंतर रक्तवाटे ती पूर्ण शरीरात पोहोचतात व दुसऱ्या शिरेवर किंवा स्नायूवर
त्याचा योग्य प्रमाणात साठा झाल्यानंतर त्यांचे दुखणे कमी व्हायला सुरुवात होते.
जास्त प्रमाणात त्रास असलेल्या रुग्णांना डेपोमेड्राँल, हायड्रोकॉटीसोन आदी इंजेक्शन
दिले जातात.योग्य प्रमाणात व नेमक्या ठिकाणी सूज कमी करण्याची क्षमता असणारे औषध
पोहोचल्यामुळे परिणाम लगेच दिसून येतात .हे इंजेक्शन देण्यापूर्वी तो भाग
स्वच्छ धुवून घेणे आवश्यक असते.
तसेच आयोडीन,बेटाजीन या औषधांचे निर्जंतुकिकरण केल्यानंतर हे
इंजेक्शन दिले जाते.हे इंजेक्शन नेमक्या ठिकाणी नेमक्या शिरेत देण्यासाठी तेथील
स्नायू,शिरा,रक्तवाहिन्या,नसा यांची रचना माहित असणे गरजेचे आहे.त्याकरिता
तज्ञांकडूनच देणे उचित असते.
PRP
Therapy : Platelet Rich plasma – प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी –
आपल्याच
रक्तातील Centrifuge करून प्लेटलेटस वेगळ्या करून इजा
झालेल्या भागात इंजेक्शन व्दारे सोडल्यावर दुखणे लवकर होते.त्यासाठी PRP थेरपी एक चांगला पर्याय आहे.
शस्त्रक्रिया : काही रुग्णांमधील दुखणे औषधोपचार
,थेरपी,इंजेक्शन यांनीही बरे होत नाही अशा काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करावी
लागते.
Your blog is valuable. Anyone is looking for the best physiotherapy company in India, you can check here
ReplyDeletebest physiotherapy company in India