Skip to main content

सांध्याची झीज कारणे व उपाय


Image result for low bone marrow
   
सांध्याची झीज कारणे व उपाय

          सांध्याची झीज होण्याच्या आजाराला ऑस्टीओआरथायटीस (ओ.ए) म्हणतात.केस कालांतराने पांढरे होणे,चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कोणालाच टळू शकत नाही.तसे ही समस्या सर्वांनाच वृद्दपकाळी उद्भभवतेच फक्त प्रमाण कमी जास्त असते व सुरु होण्याचे वयदेखील मागेपुढे होते.काहींचे सांधे जास्त प्रमाणात लवकर झिजतात,तर काहींचे बरेच वय झाले तरीही चांगले असतात.
    हा आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असेच दिवस काढावे लागणार,अशी मनाची तयारी केलेले असते.आता आपल्याकडून जास्त काही होणार नाही एखादे तेल किंवा एखादी गोळी ठीक आहे.अशा त्रासासाठी डॉक्टरांकडे काय जायचे असा विचार होतो.
     वृध्द होण्याच्या आधी जर सांधे झिजले व त्यामुळे कार्यात बाधा आली तर बरेच जण तज्ञांकडे येतात व उपचारामुळे त्यांचेपुढील आयुष्य सुकर होते.झीजेचा गतीवर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहूया.
१.       a: काही कुटुंबात सांधे लवकर झिजताना आढळतात. अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकते.
२.       स्थूलपणा : वजन जास्त असणे म्हणजे सांध्यावर भार जास्त प्रमाणात येणार त्यामुळे झीजही लवकरच होणार.गुडघे,खुबा,घोटा या सांध्यांवर याचा परिणाम जास्त प्रमाणात दिसतो.
३.       सांध्याच्या रचनेत दोष निर्माण झाल्यामुळे
(अ) पायातील वाकांमुळे,बालपणात ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेने पायात वाक येतो.या वाकामुळे सांध्यांवर समप्रमाणात भार पडत नाही.गुडघ्यात वाक आतील बाजूस असेल तर जेनु वारम म्हणतात.

आ) अव्हस्क्युलर नेक्रोसीस : खुब्यातील संध्याच्या मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकाला ‘फिमोरल हेड’ असे म्हणतात.त्याचा आकार गोलाकार असतो. काही कारणमुळे रक्त पुरवठा कमी पडल्यानंतर त्या आकारात बदल झाला तर समप्रमाणात भार न राहिल्यामुळे त्याची झीज होते. ‘अव्हस्क्युलर नेक्रोसीस’ या आजारातही असेच होते. हा आजार अतीमहासेवन किंवा स्टेरॉइड्ची औषधे यामुळे होतो.

(इ) सांध्यामध्ये समप्रमाणात भार न पडण्याचे कारण सांध्याची बदललेली रचना. ती फ्रँक्चरमुळेसुद्धा बदलू शकते.सांध्यात फ्रँक्चर असल्यास जास्त प्रमाणात झीज होण्याची संभावना असते.

(ई) सांध्याच्या अस्थिबंधामुळे सांध्याच्या हालचालींवर नियंत्रण असते.सांधे निखळण्यापासून रोखण्याचे काम हे अस्थिबंधच करत असतात.त्यांना मार लागतो तेव्हा ते ताणले जाऊन सैल होतात.त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त हालचाल होते व झीजही जास्त होते.खेळाडूंमध्ये बऱ्याच वेळा पाय मुरगळने,सांध्यांना सूज येणे हेप्रकार घडत असतात पण त्यापुढे होणाऱ्या आजारांची कल्पना नसल्यामुळे बरेच जण दुर्लक्ष करतात व कायमस्वरूपीचे नुकसान ओढवून घेतात.

४.       इतर आजारामुळे झालेली झीज: पूर्वी ज्या सांध्यामध्ये काही आजार झाला असेल तर अशा सांध्यामध्ये झीज  लवकर होते जसे-
१.संधिवात २) गाऊट ३) सांध्याचा क्षयरोग ४) हिमोफिलिया इत्यादी.


झीज होण्याच्या प्रक्रियेत नेमके काय होते ?
सांध्याच्या अस्थिच्या टोकावर गुळगुळीत आवरण असते.त्यामुळे सांध्याच्या हालचाली लयबद्ध व सुलभ होतात. त्या आवरणास आटीक्युलर कार्टिलेज असे म्हणतात,हे आटीक्युलर कार्टिलेज विशिष्ट प्रथिने (कोलँजन) व पाँलिसँकाराईडने बनलेले असते त्यामुळे त्यांच्यात दणके पचवण्याची क्षमता असते व हालचाली पण मोकळ्या होतात आटीक्युलर कार्टिलेजच्यापोषणासाठी एकमेव माध्यम असते सायनोवील फ्लुइड म्हणजे सांध्यातील द्रव . आटीक्युलर कार्टिलेजमध्ये भेगा पडतात व त्यामुळे त्याच्या खाली असणाऱ्या हाडांवर भार येण्यास सुरुवात होते.दोन्ही बाजूंच्या हाडांवरचे  आवरण निघून जाण्यास प्रांरभ  होतो. आटीक्युलर कार्टिलेजला भेगा पडल्यानंतर त्यांचे काही तुकडे मोकळे होतात व सांध्यामध्ये असणाऱ्या सायनोवील फ्लुइडमध्ये मोकळे पडलेले असतात हे तुकडे कधी कधी हालचाल होत असताना दोन्ही हाडांच्यामध्ये आल्यामुळे सांध्याची हालचाल रोखली जाते यालाच जाँईट लाँक होणे असे म्हणतात.सुरुवातीला कार्टिलेजमध्ये भेगाची खोली जास्त नसते.नंतर मात्र आवरणात खोलवर जाऊन हाडापर्यंत जाते व खालच्या हाडावर भार येण्यास प्रांरभ होतो व त्या भागाची झीज झपाट्याने होते.झीज होताना सुरुवातीला काही पोकळी निर्माण होते. त्यास सबकाँडल सिस्ट म्हणतात. त्यामुळे हाडे दाबली जातात व हाडांतील घनता वाढते.त्यास बोनी स्क्लेरोसिस म्हणतात.या स्क्लेरोटीक बोनमध्ये रक्तप्रवाह मोकळा नसतो.त्यामुळे हाडांच्या आतले प्रेशर वाढते (रेजड इंट्राआँशियस प्रेशर ) त्यामुळे हाडे दुखायला लागतात. सांध्याजवळील हाडांच्या भागात हाडांचे काही बारीक ठोके तयार होतात.याला ऑस्टीओफाइट्स म्हणतात.

 ऑस्टीओआरथायटीसची लक्षणे :
सांधेदुखी : ही सहसा गुडघ्याच्या सांध्यात होते.याची सुरुवात सांध्यात हलक्या स्वरुपाच्या दुखण्याने होते.दुखण्याची काळ प्रमाण हे हळूहळू वाढत जाते. झीज होणाऱ्या सांध्यामध्ये प्रामुख्याने गुडघ्याच्या सांध्यामध्ये आढळते.त्यामुळे जिने चढताना किंवा उतरतांना त्रास होतो. खाली बसल्यानंतर उठताना त्रास होतो.
सांध्यातील ताठरपणा : प्रामुख्याने उठताना हा ताठरपणा जाणवतो.तो साधारणताः १५ ते ३० मिनिटे असतो.दिवसाही बऱ्याच वेळा बसुन किंवा झोपून राहिल्यामुळे ताठरपणा जाणवतो .
सांध्यात सूज येणे : या आजारात सांधे सुजून येतात. तपासणीच्या वेळेस सांध्यात वाक आलेला. आढळून येतो तसेच सांध्याची सूजही लक्षात येते.कधी गुडघ्यांच्या मागच्या बाजूला सूज आल्यामुळे छोटीसी गाठ तयार होते त्यास बेकरस सिस्ट असे म्हणतात.जर ही गाठ फुटली तर खूप त्रास होऊ शकतो व तीव्र वेदना होऊन तेथील नसांवर किंवा रक्तवाहिन्यांवर दाब पडून इतर समस्या उदभवू शकतात.तपासणीच्या वेळेस मधल्या हाडांवर दाबल्यानंतर सांध्याच्या हाडावर मधल्या बाजूस वाटीच्या हाडांवर वेदना जाणवतात तसेच संध्याच्या आत येणारा आवाज (क्रेपिटस) येतो किंवा जाणवतो.तसेच सांध्यात आलेली सुजपण जाणवू शकते.
सांध्याची झीज कारणे व उपाय :  
सांध्यांची झीज झाली आहे किंवा नाही यासाठी विविध तपासण्या केल्या जातात.त्यापुढीलप्रमाणे आहेत.
१.रक्त लघवीच्या तपासण्या: या झीजमुळे रक्त लघवीचे अहवाल सर्व साधारण (नॉर्मल) असतात.पण इतर सांधाच्या आजारात रक्त,लघवीच्या तपासनीत काही दोष आढळू शकतात.सांध्याची समस्या ‘ओए’ ची आहे किंवा कुठल्या आजाराची आहे याचा अंदाज येतो.
२. क्ष-किरण तपासणी: क्ष किरण तपासणीत सांध्यातील अंतर कमी झालेले आढळते,तसेच बोन सीस्ट किंवा बोन स्टेरोसीस हेही दिसू शकते.वाढलेले हाड म्हणजेच ऑस्टीओफाइट्स दिसू शकतात. ऑस्टीओफाइट्समुळे आपल्याला ओए चे निदान होते.
    गुडघ्याचे एकस-रे उभे राहून घेतले जातात.त्यामुळे उभे राहिल्यानंतर म्हणजे सांध्यावर वजन आल्यानंतर सांध्याच्या हाडात नेमका किती वाक आलेला आहे हे कळते.गुडघ्याचे इतर एँगलने पण एकस-रे काढावे लागतात.जसे की सांध्याच्या बाजूचा ज्यात सांध्याच्या मागच्या बाजूची वाढलेली हाडे दिसू शकतात.जे समोरून काढलेल्या एकसरे मधून दिसणार नाही.तसेच वाटीची झीज पाहण्यासाठी वाटीचा फोटो काढावा लागतो.त्यास सनटाइज व्हिव्ह  म्हणतात.त्यातून वाटीच्या आणि मांडीच्या हाडाची झीज दिसते.वाटी सरकलेली आहे,की जागेवर आहे हेही कळू शकते.
उपचार: झीज झालेल्या सांध्यासाठी विविध उपचार करता येतात.ज्यामुळे रुग्णांचा आजार बरा होऊ शकत नसला तरी त्या आजारामुळे होणाऱ्या समस्या व त्रासाचे प्रमाण कमी तरी करता येऊ शकते.
प्रतिबंध: काय टाळावे हे समजले,की झीजेचे प्रमाण कमी करता येते
१.जास्त वेळ मांडी घालून बसने किंवा दोन पायावर बसणे टाळावे.
२. साठीच्या पुढे उठबशा काढणे टाळावे किंवा महिलांनी विनाकारण जमिनीवर उठबस टाळावी.उठताना आधार घेतल्यास सांध्यावर येणारा भार बराच हलका होतो
३.जास्त वेळ उभे राहणे टाळावे
४. जिना चढताना किंवा उतरतांना त्रास होत असल्यास आडव्या पावलांनी चढ-उतार करावी.
५. आधारासाठी काठी घेतल्याने भार तर कमी पडतो
वजन कमी करणे: प्रमाणापेक्षा जास्त वजन असल्यास वजन कमी केल्याने त्रास कमी होण्यास होते.
फ़िजिओथेरपी: तपासणीनंतर झीजेमुळे स्नायू किती कमकुवत झालेले आहेत,तसेच किती प्रमाणात सूज ताठरता आहे,त्यानुसार तज्ञ विविध प्रकारचे फ़िजिओथेरपीमध्ये अंतर्भूत असलेले उपाय सुचवतात.
अ.सपोर्टस: सांध्याभोवती काही गुंडाळले गेले तर सांध्याला आधार मिळतो वत्याची हालचाल कमी होऊन त्यास आराम मिळतो.
आ. शेक: शेक घेतल्याने दुखणे कमी होते.त्यासाठी वेगवेगळे उपकरणे उपलब्ध आहेत.
इ: व्यायाम व्यायामाने स्नायूची ताकद वाढते व ताठरपना कमी होतो.
औषधोपचार :
१.NSAIDS : हे सूज उतरवणारे व दुखणे कमी करण्यासाठीचे औषध आहे.यातील नवीन औषध जरी बरीच दिवस घेतली तरी काही त्रास होत नाही,असे अहवाल आहेत.
२.ग्लुकोजआमाईन व कॅान्डायटीनयुक्त औषध : हे आर्टीक्युलर कार्टीलेजचे घटक आहे.हे औषध दिल्यानंतर आर्टीक्युलर कार्टीलेजची झालेली झीज लवकर भरून येण्याची संभावना असते.म्हणून हल्ली अशा प्रकारच्या औषधाचा वापर केला जातो.
३. सांध्यात इंजेक्शन : १. स्टीरॉइड्चे इंजेक्शन: जेव्हा प्रमाणाबाहेर त्रास असतो व दुखणे खूप वाढलेले असते.तेव्हा इंजेक्शन घेतल्यास होणारा त्रास कमी होतो.पुन्हा पुन्हा इंजेक्शन घेतल्याने सांध्याची झीज होण्याची गती वाढते.त्यामुळे तज्ञ योग्य असेल अशा रुग्णांना व योग्य वेळी इंजेक्शन देतात.
1. हायलीरोननचे इंजेक्शन (एचए): हायलीरोनन हे आर्टीक्युलर कार्टीलेजमध्ये तसेच सायनोवीयल फ्युडमध्ये एक मह्त्त्वाचे घटक आहेत.
झीज झालेल्या सांध्यातले दुषित द्रव काढून घेणे व एचयुक्त द्रव सांध्यात इंजेक्शनव्दारे सोडणे याला ‘व्हीस्को स्प्ल्मेंटेशन’ म्हणतात.भारतात ही उपचारपद्धती नवीन असली तरी परदेशात ती अनेक वर्षापासून वापरली जाते.तेथील रुग्णांना या इंजेक्शनव्दारे अनेक महिने अथवा वर्ष चांगला आराम मिळाला आहे,असे सांगितले जाते.
   ‘ओए’ साठीच्या शस्त्रक्रिया : आर्थ्रोस्कोपी : ओएची सुरवात हि आर्टीक्युलर कार्टीलेजच्या झीजेने होते आणि ही झीज बऱ्याच प्रमाणात होऊनदेखील क्ष-किरणात दिसून येत नाही.काही प्रमाणात झीज झालेल्या कार्टीलेजचे काही तुकडे सांध्यात मोकळे पडलेले असतील, तर ते क्ष-किरणात दिसून येत नाही.सांध्यात सूज येते अशा वेळेस आर्थ्रोस्कोपी ही दुर्बिणीव्दारे तपासणी करून प्रत्यक्ष किती झीज झाली ते दिसते.त्याच वेळेस त्यावर शक्य असतील ते उपचार करता येतात.झीज झालेल्या सांध्यातील छोटे तुकडे तसेच झिजलेल्या कुर्च्या खराब झालेले सायनोवीयल मेम्ब्रेन काढण्यासाठी एखाद्या टाक्याची छेद असलेली आर्थ्रोस्कोपी दरम्यान सांध्यात एक ते दोन लिटर सलाईन सोडून बाहेर काढले जाते.त्यामुळे सांधा स्वच्छ धुतला जातो.
२.ऑस्टीओटॅामी : हाडात छेद घेण्याची शस्त्रक्रिया किंवा हाड कापण्याची शस्त्रक्रिया.हाडांमध्ये आलेला वाक हे सांध्याची एका भागाची तेथे जास्त प्रमाणात भार आल्यामुळे तेथील झीज गतिमान करतात.हे वाक सरळ करण्यासाठी सांध्याजवळील हाडांचा काही भाग कापून तिथे हाडात आलेला वाक दुरुस्त करून जोडता येतो.गुडघ्यासाठी ‘हाय टीबीयल ऑस्टीओटॅामी ‘ शस्त्रक्रिया केली जाते.ती वेळेवर केली म्हणजे इतर भागाची झीज होण्यापूर्वी  केली तर पुढे उपचारासाठी लागणारी टोटल जॉइंन्ट रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया टळते.
३. मोझॅइक प्लॅस्टी : खराब झालेले आर्टीक्युलर कार्टीलेज याची पुननिर्मिती होत नाही.जेव्हा ओएमध्ये कार्टीलेजमध्ये भेगा  व या भेगा खालच्या हाडापर्यंत पोहोचतात तेव्हा हाडातून नवीन रक्तवाहिन्यांव्दारे हिलिंग होण्याची प्रक्रिया होते.पण यात फायब्रोकार्टीलेज तयार होते जे नेहमीचा आर्टीक्युलर कार्टीलेजच्या क्षमतेचे नसते.
     कार्टीलेजचा खराब झालेला भाग काढून तेथे चांगल्या आर्टीक्युलर कार्टीलेजचे रोपण करणे.ही शस्त्रक्रिया हल्ली केली जाते.या शस्त्रक्रियेला ‘मोझॅइक प्लॅस्टी’ म्हणतात.ज्या भागावर सांध्याच्या हालचालीत दाब येत नाही,अशा भागातून आर्टीक्युलर कार्टीलेज रोपण करण्याकरिता घेतले जाते.या शस्त्रक्रियेणे एक इंचापर्यंत खराब झालेल्या कार्टीलेजचा भाग बदलता येतो.
४.कृत्रिम सांधेरोपण : सांधे खूपच खराब झाल्यानंतर कृत्रिम सांधेरोपण हा एकमेव पर्याय राहतो.


Comments


  1. For exceptional care for your sports injury or rehabilitation needs in Michigan, there's no better choice than this leading Physical Therapy & Sports Injury Clinic. Renowned for their expertise and commitment to enhancing your health and performance, they guarantee a swift return to peak condition, ensuring you're back in action stronger than before.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्नायू- शिरांचे दुखणे

जिम मध्ये होणारे दुखणे /खेळांडूना होणारी दुखापत. कधी एखादे दुखणे असे जडते , की ते नेमके कशामुळे सुरु झाले हेच निष्पन्न होत नाही.सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात असलेले दुखणे क्षुल्लक कारणामुळे उदभवले असेल असे आपण समजतो.ताण पडल्यामुळे ,मुरगळल्या मुळे हे दुखणे सुरु झाले असावे ,ते आपोआप बंद होईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.असे काही दिवस जातात.एक-दोन आठवडे उलटल्यावर आपले दुखणे थांबलेले नसते.बऱ्याच वेळेस या दुखण्याकडे आपला दुर्लक्ष करण्याकडे जास्त कल असतो,पण नंतर हे त्रासदायक होत जाते.हलक्याफुलक्या दुखण्याला ( Dull ache ) ( डल एक ) म्हणतात, तर त्रासदायक झाल्यास त्याला बोरिंग पेन म्हणतात.सहसा अशा दुखण्यात स्नायू शिरांवर. सूज आल्यामुळे हे दुखणे सुरु झालेले असते.याचे कारण त्या शिरेवर अचानक ताण पडल्यामुळे तिथे दुखापत किंवा इजा झालेली असते किंवा कधी थोड्याप्रमाणात पुन्हा पुन्हा ताण पडल्यामुळे असे दुखणे जडते. अशा प्रकारचे दुखणे विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर जास्त आढळते.जसे ड्रीलिंगचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मनगटाचे किंवा कोपराच्या शिरामधले दुखणे असते.लोहारी कामामध्ये वारंवार

“अस्थिभंग व प्लास्टर ”

               प्ला स्टर हे P.O.P. प्लास्टर ऑफ पॅरीसचे बनविले जाते.प्रथम फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे जास्त प्रमाणात केमिकल बांधकाम व वैदिक व्यवसायात उपयोग झाला .त्या मुळे हे नाव वापरण्यात आले.याची सुरवात १८५२ मध्ये ए. मॅथिसन या आर्मीतल्या चिकित्साने याचा वापर स्प्लिंट   तयार करण्यासाठी केला.जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरीस तयार होते.जिप्सम हे हायडेटेड कॅल्शियम सल्फेट व त्यात इतर काही घटक असतात ते इतर घटक काढून स्वच्छ केल्यानंतर   अनहायड्रस कॅल्शियम सल्फेट तयार करतात.तेच हे P.O.P. पाण्यात टाकल्यानंतर एक्झोधर्मिक रिअॅक्शन होते.त्यामुळे प्लास्टर केल्यानंतर थोडावेळ गरम वाटते .             एकविसावे शतक आले तरी प्लास्टरपासून अजून काही सुटका मिळालेली नाही,असे चित्र सध्यातरी आहे.दिवस, महीने हा कालावधी कमी झाला पण प्लास्टर रहित अस्थिरोग उपचार असे परदेशातून सुद्धा ऐकावयास मिळालेले नाही.             प्लास्टर ची रुग्णांना अलर्जी,भीती असते मात्र नाईलाजाने ते प्लास्टर करण्यास तयार होतात ,मला चालता येणार नाही ,माझे फिरणे बंद होईल माझ्या दररोजच्या हालचालींवर मर्यादा येतील अशा प्रकारच्या क