“औद्योगिक अपघात प्रथमोपचार”
प्रथमोपचाराची माहिती असणे आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरते. प्रथमोपचार निरनिराळ्या परिस्थितीत देता येतो. प्रथम आपण (DR. A.B.C.) of first Aid काय असते ते पाहू,प्रथमोपचाराचा पाया.
D-Danger Signals (डेंजर सिग्नल्स)-
धोक्याच्या सूचना- घटना घडल्यानंतर रुग्णासाठी व इतरांसाठी उदा.अपघातानंतर काही
वेळानंतर गाडीचा स्फोट होवू शकतो म्हणून तशी सावधानता ,सज्जता
अपघातानंतर गाडी जवळ जाताना बाळगणे, आदि.
R-Response (रिस्पॉन्स)-
रुग्णाची प्रतिक्रिया किंवा हालचाली- बेशुद्ध अवस्थेत आहे, कि अर्धवट शुद्धीत कि भांबावलेल्या अवस्थेत आहे. Airway obstruction
म्हणजे स्वसनमार्गातील अडथळे. हे अडथळे वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतात. जेवताना माशाचा काटा अडकणे यामुळे व्यक्ती अस्वस्थ होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या घशात बिस्कीट
अडकल्यामुळे ते कोसळले होते. भारतीय लष्कराचे एक अधिकारी माशाचा काटा अडकून मदतीअभावी
मृत झाले.
अपघातात स्वसनमार्गात दाताची कवळी, जीभ, बेशुद्ध अवस्थेत मागे घशात पडून राहिल्यामुळे अडथळा आणते.
B-Breathing (ब्रीदिंग)-
ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास चालू आहे अथवा नाही आणि असेल तर तो कशा
प्रकारचा आहे? नियमित
आहे कि नाही, अतिजलद
तर नाही ना? आदी
C- Circulation (सर्क्युलेशन)-म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे कि नाही हे
पाहण्यासाठी
Look (लूक), Listen (लीसन) & Feel (फील) म्हणजे पहा, ऐका व संवेदना घ्या. छातीवरच्या व मानेवरच्या रक्तवाहिन्या हलताना दिसतात का? त्यांचे ठोके जाणवतात का? कान छातीवर ठेवून छातीची धडधड ऐकू येते का? यावरून हे स्पष्ट होईल. तसेच सरावाने नाडी पाहता येते, असे करणे याला Primary Surgery म्हणतात, म्हणजेच
प्रथम तपासणी रक्ताभिसरणात
काही बिघाड आहे असे छातीच्या ठोक्यांच्या गतीवरून व नाडी परीक्षण केल्यावर कळते. नाडीचे ठोके जलद असतील, तर एखाद्या वेळेस रक्तस्त्रावामुळे तसे होते. अपघातात सापडलेल्या रुग्णाला रक्तस्त्राव हा बाह्य सदृश (External
Bleeding) व अंतर्गत
(Internal Bleeding) अशा
दोन्ही प्रकारे होण्याची शक्यता असते. अंतर्गत
रक्तस्त्राव होत असल्यास नाडी जलद होते व रक्तदाब खालावतो. त्याची लक्षणे म्हणजे रुग्णाला घाम येणे, चेहरा व शरीर पांढरे पडलेले असते, तसेच थंडही पडलेले असते. जिभेला कोरड येते. पोटात रक्तस्त्राव होत असेल, तर पोट निभर होते. छातीच्या फासळ्या मोडल्याने जर रक्तस्त्राव असेल तर छाती
त्या ठिकाणी दुखते, तर अशी लक्षणे दिसली तर अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे असे ओळखावे. रुग्ण जरी शुद्धीवर असेल व बाह्यता काही रक्तस्त्राव नसेल
तरीही तातडीने रुग्णालयात हलवावे. कारण कधी कधी असे रुग्ण अचानक उभे असताना, चालताना कोसळतात. सदृश्य रक्त्स्त्रवच्य बाबतीत तर रक्त दिसतेच. त्यामुळे शोध लावण्याचा प्रश्नच येत नाही; पण हा रक्तस्त्राव कोणत्या प्रकारचा आहे हे पाहणे महत्वाचे
असते.
रक्तस्त्राव शुद्ध
रक्त (Arteries) नेणा-या रोहीणीतून आहे, कि अशुद्ध रक्त नेणा-या निलेतून (Veins)कि केशवाहिनीतून(Capillaries) आहे, हे लक्षात घ्यायला हवे. रोहीणीतून वाहणारे रक्त(शुद्ध रक्त) लाल
भडक असते व पिचाकारीसारखे लांबपर्यंत फवारे उडतात. निलेतून होणारा रक्तस्त्राव (अशुद्ध रक्त) गडद लाल असतो व सहसा तो वेगाने होतो; पिचकारीसारखे फवारे नसतात व केशवाहिनीतून वाहणारे रक्त
संथपणे येते. आता
आपण बाह्य रक्तस्त्राव रोखण्यासाठी प्रथमोपचार करण्याच्या पद्धती पाहू.
Direct Pressureडायरेक्ट प्रेशर:-
जेथून रक्तस्त्राव होतो आहे तेथे स्वछ रुमाल, कापड ठेवून दाब देणे म्हणजे रक्त गोठून रक्तस्त्राव बंद
होईल.
Elevation -इलेवेशन:-
म्हणजेच उंच करणे म्हणजेच ज्या हातातून किंवा पायातून रक्तस्त्राव होतो आहे तो
उंच करणे. यामुळे शुद्ध रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. त्याउलट जर रक्तस्त्राव
होणारा भाग शरीरापेक्षा खाली असेल, तर रक्तस्त्रावाचे प्रमाण वाढते.
बाह्य रक्तस्त्राव –
सद्दरूश्य असल्यामुळे लगेच दिसतो,त्यामुळे त्यावर उपचार लगेचच करता येतो.
परंतु अंतर्गत रक्तस्त्राव दिसून न आल्यामुळे आपल्या बेसावध करतो, त्यामुळे त्याची
लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे.
Pressure Arterial path
-रोहिणीवर दाब देणे:-
रक्तवाहिन्यांचे मार्ग व ठिकाण हे प्रथमोपचार प्रशिक्षणात माहिती देतात.
रोहिणीतून होणारा रक्तस्त्राव हा त्या त्या भागाकडे येणा-या रोहिणीवर मार्गात दाब
देऊन कमी करता येतो.
टूरनिके(Torniquet) म्हणजे आवळपट्टी:-
जेव्हा इतर सर्व उपायाने रक्तस्त्राव थांबत नाही व रुग्णाची प्रकृती
खालावण्याची संभावना असते व रुग्णालय काही अंतरावर असते, रुग्णालयापर्यंत नेण्यास
वेळ लागणार असतो. तेव्हा आवळपट्टी किंवा टूरनिके हा उपाय अवलंबिला जातो. प्रायमरी
सर्वेमध्ये A. B.C & First आवळ हे महत्वाचे घटक म्हणजे श्वसनमार्ग,
श्वासोश्वास आणि रक्तभिसरण यांच्यासंधर्भात माहिती होते, त्यानुसार त्यांच्यावर
प्रथमोपचार करता येतात.
Cardio Pulmonary
Resucitation (CPR) कार्डीओ पल्मनरी रिससीटेशन:-
हृदयाच्या अथवा श्वासोश्वासाच्या कार्यावर नियंत्रण नसेल तर ते व्यवस्थित
करण्यासाठी जे उपाय केले जातात त्यांना सीपीआर म्हणतात. यात कार्डियाक मसाज म्हणजे
छातीवर हृदयाच्या ठिकाणी (डाव्या बाजूस) हाताने चोळणे व आर्तिफ़िशिअल रेसपिरेशन
म्हणजेच कृत्रिम श्वासोश्वास देणे यांचा अंतर्भाव असतो.
सेकंडरी सर्वे:-
प्रायमरी सर्वेत हृदय व श्वसनप्रक्रियेत काही दोष नाही हि खात्री झाल्यावर इतर
सर्व अवयवांचे निरीक्षण केले जाते त्याला सेकंडरी सर्वे म्हणतात. ‘हेड टू टो’
म्हणजे डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत सगळे अवयव तपासले जातात, असे करताना खूप
वेळ घालावला जात नाही, त्यासाठी सरावाने कुठे दोष आहे हे लक्षात घेणे महत्वाचे असते.
सेकंडरी सर्वेद्वारे डोक्यात जखम आहे का? ? डोळ्यात काही गेल तर नाही ना? नाकातून,
कानातून अथवा तोंडातून रक्त येते का? हातांना किंवा पायांना जखमा, फ्रॅक्चर किंवा
निखळलेला सांधा, नसांच्या जखमा, पोटात मार, छातीच्या फासळ्यांना मार हे सगळे
तपासून घेतले जाते. पाठीचा भागसुद्धा तपासून घेतला जातो. त्यानंतर पुढे निर्णय
घेतला जातो तो प्रथमोपचार कोणता करायचा किंवा तो करण्यासाठी परिस्थिती आहे का?
रुग्णाला पुढे रुग्णालयाकडे किंवा सुरक्षित ठिकाणी हलवायचे असेल, तर व्यवस्थितपणे
कसे हलवावे याबाबत विचार करून ताबडतोब निर्णय घेऊन तसे केले जाते.
Emergency care (इमरजन्सी केअर)- मदत आणि तत्काळ घ्यावयाची काळजी:-
रुग्णाला हलवण्यापूर्वी जर हात अथवा पायचे फ्रॅक्चर झाले असल्यास त्याला
आधारपट्टी म्हणजे स्प्लिंट दिले जाते, असे केल्याने अवयवांना आधार मिळतो व हाडांचे
एकमेकांवर घर्षण न झाल्यामुळे रुग्णाचे दुखणे कमी होते व होणा-या हानी टाळल्या
जातात. आधारपट्टी म्हणून वेगवेगळे घरगुती आधार दिले जातात, जसे लाकडी फुटपट्टी,
क्रिकेट बॅट, उशी आदि. अशा प्रकारे आधार दिल्यावर रुग्णाला तिथल्या तिथे हलविणे व
रुग्णालयात नेणे सोपे होते. रुग्णाला रुग्णालयापर्यंत व्यवस्थित घेऊन जाणे हि एक
प्रकारे कसरतच असते. त्यासाठी किती व्यक्ती, किती अंतर व नेण्यासाठी कोणते साधन
आहे हे घटक महत्वाचे ठरतात. पायाचे फ्रॅक्चर असल्यावर चादर अंगाखाली अंथरून तिच्या
सहाय्याने दोन्ही बाजूंनी उचलून व मध्ये कमरेला एकाने आधार देऊन नेता येतो. अशा
प्रकारे स्ट्रेचरच पाहिजे असा अट्टाहास करण्यापेक्षा लवकर रुग्णाला
रुग्णालयापर्यंत तात्पुरते उपाय करून कसे पोहचवता येईल हे बघावे. घरातील इतर
वस्तूंचा वापर करून स्ट्रेचर तयार करता येते. जसे दोरखंड, फेटा, बेल्ट यांचा वापर
करून रुग्णाला कसे हलवायचे याची प्रात्येक्षिके प्रशिक्षणात पाहता व शिकता येतात.
कधी बाहेर काहीच साहित्य नसल्यास दोन व्यक्तींच्या हाताची घडी करून रुग्ण हलविता
येतो. अशा प्रसंगात प्रथमोपचार देऊन एखाद्या रुग्णाचा जीव वाचतो किंवा हात-पाय
वाचतात तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांची कृतज्ञ दृष्टीच प्रथमोपचार देणा-या
व्यक्तीला बरेच समाधान देते.
-डॉ.गिरीश औताडे.(अस्थिरोग तज्ज्ञ)
०२५३-२४७२५५२/२४७२५५३
०८०४८०४००२१
Comments
Post a Comment